१) मराठा सोयरीक.com या संकेतस्थळावर फक्त आणि फक्त खान्देशातील कुणबी मराठा समाजातील उमेदवारांनी नोंदणी करावी.

२) नोंदणी फक्त मराठी आणी इंग्रजी भाषेत भरावी.

३) नोंदणी मोफत आहे, नोंदणी साठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, नोंदणी करतांना माहिती अचुक आणि व्यवस्थित भरावी, नोंदणी झाल्यावर संकेतस्थळाच्या What's up नंबरावर उमेदवाराचे/पालकांचे ओळख पत्र टाकणे अनिवार्य आहे.

४) संकेतस्थळावर संकेतस्थळाचा What's up नंबर उपलब्ध आहे, नोंदणी केल्यावर दिलेल्या what's up क्रमांकावर उमेदवार/ पालकांना ओळख पत्र टाकावे लागेल, उमेदवाराच्या परिचय/ओळख पत्राची सत्यता पडताळणी केल्यावरच २४ तासाच्या आत परिचय पत्र संकेतस्थळावर उपलब्ध केले जाईल.

५) नोंदणी फार्म मध्ये सगळी माहिती भरणे अनिवार्य नाही मात्र; उमेदवाराची प्राथमिक माहिती भरणे अनिवार्य आहे.

६) उमेदवाराचा फोटो संकेतस्थळावर टाकणे अनिवार्य नाही,फोटो संकेतस्थळावर ईच्छा असल्यावर टाकावा मात्र फोटोचा गैरवापर झाल्यावर संयोजक जबाबदार राहणार नाहीत.

७) संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर जर तुम्हाला अनुरूप स्थळे शोधायचे असतील तर पुर्ण प्रोफाईल,फोटो आणि मोबाईल नंबर पहाण्यासाठी तुम्हाला १२ महिन्यासाठी 999/- रूपये भरावे लागतील, एकदा शुक्ल भरले की १२ महिने (Paid Profile) मर्यादा राहील, त्या नंतर परत नविन शुल्क आकारण्यात येईल.

८) सदस्य शुल्क आनलाईन भरल्यावर लगेच प्रोफाईल सक्रिय केली जाईल( Paid Profile ), तसेच NEFT/Paytm/Bhim App ने शुल्क भरल्यावर तुम्हाला संकेतस्थळा वर दिलेल्या What's up नंबरावर पैसे भरल्याचा व्यवहार क्रमांक आणी परिचय पत्र क्रमांक पाठवावा लागेल, शुल्क संयोजकांना प्राप्त झाल्यानंतर २४ तासाच्या आत प्रोफाईल सक्रिय केली जाईल,एकदा सदस्य शुल्क भरल्यावर कोणत्याही परिस्थितीत शुल्क परत मिळणार नाही.

९) उमेदवाराचे लग्न जमल्यावर संयोजकांना फोन/ईमेल केल्यावरच नोंदणी रद्द केली जाईल.

१०) संयोजक संकेतस्थळावरील उमेदवाराची अचुक माहितीची हमी देत नाही; म्हणून उमेदवार/पालकांनी स्वता: चौकशी करूनच शेवटचा निर्णय घ्यावा.

११) संकेतस्थळाचे संयोजक कोणत्याही संबंधात मध्यस्थी करणार नाहीत,तुम्हाला ऐखादे स्थळ पंसत पडल्यावर तुम्हाला स्वता: समोरच्या उमेदवाराला संपर्क करावा लागेल.

१२) मराठा सोयरीक.com या संकेतस्थळाचे उपयोग फक्त लग्न संबंध घडावे म्हणून आहे.या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी या संकेतस्थळाचा उपयोग होणार नाही.

संयोजक www.marathasoyrik.com