आमच्या विषयी
राष्ट्रीय मराठा सेवा संघ संचालित मराठा वधु-वर सुचक कक्षाचे अधीकृती वधु-वर सुचक संकेतस्थळ.
राष्ट्रीय मराठा सेवा संघाचे वधु-वर सुचक कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब श्री गजानन गोविंदा पाटिल यांच्या मागील तिन पिढ्या मराठा सोयरीक म्हणून समाज सेवा करत आहेत.
त्याचप्रमाणे मागील सहा वर्षांपासून अनेक मराठा वधु-वर सुचक What's up ग्रूप बनऊन, नियमित हे ग्रूप निशुल्क चालवत आहेत.
What's up ग्रूपच्या बच्याच मर्यादा पाहता, लग्न करु ईच्छुत उमेदवार आणि त्यांचा पालकांसाठी हक्काचे वधु-वर सुचक संकेतस्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने www.marathasoyrik.com या संकेतस्थळाची कल्पना आली आणी ती प्रत्यक्षात उतरवली गेली.
या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे या संकेतस्थळाचा साधेपणा आणि कमी सदस्य शुल्क. ना नफा ना तोटा या उद्देशाने आणि फक्त समाज सेवा हाच उद्देश ठेऊन या संकेतस्थळाची स्थापना केली गेली आहे.
या संकेतस्थळाचा उपयोग तुम्हाला अनुरुप स्थळे शोधण्यासाठी नक्की होईल अशी आशा तसेच या संकेतस्थळाच्या माध्यमातून हजारो लग्न संबंध घड़तील हीच ईश्वरचरणी प्रार्थना.