लग्नानंतरची दोन वर्षे प्रत्येक जोडप्यासाठी असतात खूप महत्त्वपूर्ण, या गोष्टींची घ्या आवर्जून काळजी!
लग्नानंतर पहिले दोन वर्षे प्रत्येक जोडपं नातं घट्ट करण्यासाठी प्रयत्नशील असतं यात काहीच शंका नाही. या काळात पती-पत्नी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात शिवाय एकमेकांच्या माहित नसलेल्या सवयी देखील त्यांना कळतात. प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांना एकमेकांमधील चांगल्या-वाईट सवयी माहित असतात तर अरेंज्ड मॅरेजमध्ये याच्या एकदम उलट असते. अशावेळी आपल्या जोडीदाराची एखादी सवय खटकू लागल्यास त्यावरुन वाद घालत बसण्यापेक्षा प्रेमाने संवाद साधा व समस्या सोडवा.
नातं कोणतंही असो, ते सकारात्मक विचारांनी सुरु करण्याचा सल्ला दिला जातो. असं यामुळे की, लग्नानंतर अनेक लोक स्वत:ला जबाबदा-या व कर्तव्यात बांधलं असल्याचं फिल करतात आणि या कारणामुळे त्यांना आपल्या जोडीदाराप्रती नकारात्मक भावना व भंग झाल्याच्या भावना मनात येऊ लागतात. पण ही चूक न करता प्रत्येक जोडप्याने आपलं सांसारिक जीवन एखाद्या मजेदार राईडसारखं जगलं पाहिजे. कारण यात एकमेकांसोबत आनंदाने जीवन जगण्याचा व एकत्र काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते.
लग्न काळातील मजा व हनीमून संपल्यानंतर काही जोडप्यांना पुन्हा एकदा पहिल्यासारखं जीवन रटाळ वाटू लागतं. काही जोडपी हे विसरुनच जातात की सांसारिक जबाबदा-या व कर्तव्य पार पाडण्यासोबतच रोमांस जिवंत ठेवणंही गरजेचं असतं व हे शक्यही होऊ शकतं. नातं फ्रेश ठेवण्यासाठी हनीमूनसारख्या छोट्या मोठ्या ट्रिप्स काढणं गरजेचं असतं. या ट्रिप्स मध्ये एकमेकांना वेळ देण्याची संधी मिळते शिवाय रोजच्या जीवनात काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी अनुभवता येतात.
लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात अनेक जोडपी विविध कारणांमुळे एकमेकांशी संवाद साधणं टाळतात. जे की त्यांच्या संसारात गैरसमजांना निमंत्रण देऊ शकतं. संवाद आटल्यास पुढे जाऊन नातं खिळखिळं होऊ शकतं हे अनेक जोडपी विसरुनच जातात. त्यामुळे या काळात दूर पळण्यापेक्षा, वाद घालण्यापेक्षा, संवाद टाळून रुसून बसण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याचा प्रत्येक जोडप्याने प्रयत्न करावा. संवाद ही सुखी नात्याची पहिली पायरी असते जी पार करणं सोपं नसतं.
लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ असा असतो ज्यामध्ये तुम्ही नातं घट्ट करण्यासोबतच एकमेकांच्या मनात आपला आदर रुजवू शकता. बहुतांश जोडपी लग्न झाल्या झाल्या ऑफिसच्या कामाच स्वत:ला जुंपून टाकतात याचा प्रभाव नव्याने सुरु झालेल्या सांसारिक आयुष्यावर पडू शकतो. यामुळे एकमेकांना जाणून घेण्याची संधीच मिळत नाही व यामध्ये एकमेकांविषयी चुकीचे समज बनवून पार्टनर तसं वागू लागण्याची शक्यता अधिक असते. शिवाय आपल्यासाठी जोडीदाराला वेळच नाही ही भावना मनात असुरक्षितता व नकारात्मक भावनांना खतपाणी घालू शकते. म्हणून लग्नाच्या सुरुवातीलाच नाही तर आयुष्यभर आपल्या जोडीदाराला भरपूर वेळ द्या व नातं सजीव ठेवण्याचा प्रयत्न करा.
Fill Up Registration Form
आवेदन पत्र भरें
Profile Will be Verified
प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी
Search Your Life Partner
अपना जीवन साथी खोजें