राष्ट्रीय मराठा सेवा संघ संचलित वधु-वर सुचक कक्ष अधिकृत संकेतस्थळ.

लग्न म्हणजे...

लग्न म्हणजे...

लग्न म्हणजे प्रेम, जबाबदा-या, आत्यंतिक गरजेची गोष्ट अशा अनेक व्याख्या मोठ्यांकडून कायमच ऐकवल्या जातात. पण ज्यांना ते करायचं असतं ती तरुणाईच याबाबत गोंधळलेली असते. त्यामुळे आम्ही त्यांनाच लग्नाची त्यांची व्याख्या विचारली...लग्न म्हणजे प्रेम, जबाबदा-या, आत्यंतिक गरजेची गोष्ट अशा अनेक व्याख्या मोठ्यांकडून कायमच ऐकवल्या जातात. पण ज्यांना ते करायचं असतं ती तरुणाईच याबाबत गोंधळलेली असते. त्यामुळे आम्ही त्यांनाच लग्नाची त्यांची व्याख्या विचारली...मैत्रीचा प्रवासलग्न म्हणजे एक सुंदर प्रवास. त्याची वाट एखादेवेळी खडतर असेल पण स्वतःला आणि जोडीदाराला दिलेलं वचन पाळणं महत्वाचं असतं. पती-पत्नीपेक्षाही चांगले मित्र म्हणून राहणं जास्त गरजेचं असतं. एकमेकांना मानसिक आधार दिला तर हे नातं टिकू शकतं. आपलं हक्काचं माणूस आपल्यासोबत आहे हे फीलिंग लग्नच आपल्याला देत असतं. - डॉ. ईश तराणेकर कमिटमेंट लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचं मिलन नव्हे तर दोन कुटुंबांचं मिलन. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर आयुष्यातले महत्वाचे क्षण घालवणं फक्त लग्न या संस्कारामुळेच शक्य होऊ शकतं. ही एक कमिटमेंट आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. ती जपत बदलांचा स्वीकार केला तर हे नातं नक्कीच यशस्वी होऊ शकतं. - मधुरा सुगवेकर बेडीलग्नाची बेडी असं म्हणतात ते खरंच असावं. लग्नानंतर अनेक बंधनं येऊ शकतात. खासकरून मुलींचं तर सगळंच आयुष्य बदलून जातं. नवीन घर, नवी माणसं, नव्या जबाबदाऱ्या यांत अॅडजेस्ट करणं सोपं नाही. पण तिच्या सासरच्यांनीही तिला समजून घेतलं प‌ाहिजे. कारण प्रत्येकवेळी मुलींनी सांभाळून घ्यायचे दिवस आता गेलेत. - पूनम सुर्वेदुसरा जन्म लग्न म्हणजे दुसरा जन्मच असतो. तो आयुष्यातला सगळ्यात मोठा बदल असतो. ही खूप मोठी जबाबदारीच म्हणावी लागेल, कारण एका नव्या माणसाचा आपण दैनंदिन जीवनात स्वीकार करत असतो. एकमेकांना गुण दोषांसकट स्वीकारलं, तरी लग्नानंतर मतं आणि विचार बदलू शकतात. त्यावेळी एकमेकांबद्दलचा आदरच त्या नात्याला सावरतो. - सागर भद्रिगेखास नातंलग्न म्हणजे आयुष्यातल्या रोमँटिक प्रवासाची सुरुवात. कितीही अडचणी, ताण तणाव असले तरी घरी कुणीतरी आपली वाट बघतंय आणि आपण कुणासाठीतरी खूप महत्त्वाचे आहोत हे लग्नानंतरच समजू शकतं. वाद-भांडणं तर प्रत्येक नात्यात होतात पण एकमेकांतल्या ओढीने आपण पुन्हा एकत्र येतो, तेच लग्न असावं! - आदित्य बर्वेसंकलन : आकांक्षा मारुलक



PROCEDURE

Procedure Img 1

Fill Up Registration Form

आवेदन पत्र भरें

Procedure Img 3

Profile Will be Verified

प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी

Procedure Img 4

Search Your Life Partner

अपना जीवन साथी खोजें