राष्ट्रीय मराठा सेवा संघ संचलित वधु-वर सुचक कक्ष अधिकृत संकेतस्थळ.

वर मुलाचा शोध घेतांना!

वराचा शोध घेतांना!
"""""""""""""""""""""""""""""""
        वयात आलेल्या मुलीचं लग्न करायची सर्वच आई वडिलांना घाई असते.   अशा वेळी ,वराचा शोध घेतांना ,  " तो नोकरीला  आहे की नाही  " हे पाहण्यापेक्षा, "तो संसार चालवाययला सक्षम आहे की नाही" , हे पहायला हवे. . 
"""""""""""""""""""महेशबाबा घुगे.
                    """""""""""""""""""
मुलगी म्हटली की ती आईवडिलांच्या काळजाचा तुकडा असते. जन्मापासून तर  सासरी जाई पंर्यत मुलीचं घरात कोड कौतुक होत असते. वेळ प्रसंगी आई वडिल ऊपाशी रहातीत  , पण मुलींची हौस पूर्ण करतात. मुलगी वयात आली की, 
आई वडिलांना तिच्या लग्नाची घाई करतात.
       वर संशोधन करतांना नोकरी
करणारालाज्ञ प्राधान्य दिले जाते, किंबहुना मुलीला आणि आई वडिलांना नोकरी करणाराच मुलगा हवा असतो. शिक्षण हा त्यांच्या लेखी दुय्यम भाग असतो. 
             सध्या प्रत्येक समाजात 
मुलींची वाणवा आहे. त्यामुळे, वर आणि वराचे आई वडिल, मुलगी पसंत करतांना लवचिक भूमिका 
स्विकारताना दिसतात‌  
              मुलाला हुंडा देण्याची
किड सर्वच जातींना लागली आहे पण , मुलींचा तुटवडा लक्षात घेता, आता कांही ठिकाणी गंगा उलटी वाहू लागली आहे. दलाला मार्फत मुलीच्या आईवडिलांना पैसे देऊन विवाह केला जाऊ लागला आहे. काही ठिकाणी ठग गिरीचाही अनुभव येत आहे. 
           नोकरी असलेल्या मुलाला अधिक प्राधान्य असल्याने शिपायांची का होईना नोकरी 
मिळावी म्हणून मुलं आणि त्याचे
आईवडिल प्रयत्नशिल असतात. त्यासाठी वाट्टेल तेवढे पैसे मोजले जातात. एवढेच नव्हे तर  आपण नोकरीला आहोत हे दाखविण्यासाठी, एक एक वर्षें विना वेतन काम करण्याचीही मुलांची मानसिकता असते.अशा तकलादू नोकरदारांच्या बरोबर  लग्न झाले तर, भविष्यात , संबंधीत 
मुलीवर आणि तिच्या आई वडिलांवर पश्छातापाची पाळी येते. 
             मुलगा नोकरीला आहे की नाही हे पहाण्या ऐवजी तो
घर संसार चालविण्यासाठी सक्षम
आहे की नाही, हे पहाणे महत्वाचे ठरते.  
            आपल्या माहेरच  सर्व वैभव सोडून मुलगी आपल्या घरी 
आली आहे , तीला माहेरची उणीव भासणार नाही याची जाणीव ठेवून तिला सासरी वागणूक मिळाली तर ती सासरी सुखी रसुखी समाधानी राहू शकते. 
        त्याच प्रमाणे सासरी गेलेल्या मुलीने आपल्या सासु सासर्यांना आपल्या आईवडिलांच्या जागेवर , दिरांना भावाच्याजागेवर आणि नंणंदेला  बहिणीच्या मानले तर सासरही  खर्या अर्थाने  सुखी समाधानी राहू शकते.
         देशाची शांतता आणि सुव्यवस्था समाजावर,  समाजाची शांतता व सुव्यवस्था कुंटुंबावर आणि कुंटुंबाची शांतता व सुव्यवस्था सुनेवर  व मुलांवर अवलंबून असते याची जाणीव सुनेला आणि मुलालाही  असायला हवी. त्यासाठी शालेय जीवनातच उभयतांना शिक्षण 
दिले जायला हवे.



PROCEDURE

Procedure Img 1

Fill Up Registration Form

आवेदन पत्र भरें

Procedure Img 3

Profile Will be Verified

प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी

Procedure Img 4

Search Your Life Partner

अपना जीवन साथी खोजें